मराठी कुटुंबातील तरुणीने आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत मिळवलं यश

0

मलेशियातील क्वालालांपूरमध्ये मिस ब्युटी युन्हिवर्स 2020 चं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व अंकिता पाटील हिने केले होते. या स्पर्धेमध्ये अंकिता उपविजेती ठरली आहे. तिने या स्पर्धेमध्ये ‘बेस्ट स्माईल’ आणि ‘बेस्ट कॅट वॉक’ हे पुरस्कार मिळवले आहेत. या स्पर्धेकरीता तिला माजी मिस इंडिया पूजा बिमराह यांनी प्रशिक्षण दिले होते. अंकिता पाटील हिचे वडील मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर काम करतात. पाटील कुटुंब हे मूळचं दादरचं असून अंकिताची आई ही नर्स म्हणून कामाला आहे. मराठी कुटुंबातील अंकिताने आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत मिळवलेलं यश हे वाखाणण्याजोगे आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहचण्याचा प्रवास सोपा नव्हता असे अंकिताने सांगितले आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी देशभरातील तरुणींमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये अग्रभागी राहात यश मिळवण्यामागचे गमक हे अथक परीश्रम असल्याचं तिने सांगितलं आहे. मॉडेलिंग आणि चित्रपटसृष्टीत पाय ठेवण्याची आपली इच्छा असल्याचं तिने म्हटले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here