मनसेच्या महाअधिवेशनाला आता फक्त काही दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. मनसेचा हा महामेळावा मुंबई येथे 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी होतोय. या महावेळाव्यात राज ठाकरे हे पक्षाची नवी दिशा ठरवणार आणि सांगणार आहेत. पक्षाला नवी उभारी देण्यासाठी सोडून गेलेल्या शिलेदारांना पुन्हा मनसेत आणण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली आणि चर्चा केली. त्याचबरोबर प्रकाश महाजन यांनाही राज ठाकरे यांनी भेटायला बोलावलं होतं.
