”सरकारचा कारभार पाहून सरडाही आत्महत्या करेल”

0

नागपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या भूमिका इतक्या वेगाने बदलतात की सरडा सुद्धा आत्महत्या करील, अशी घणाघाती टीका माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, 24 ऑक्टोबर 2019 रोजी जनादेशाचा अपमान करीत आघाडी सरकार अस्तित्वात आले. तेव्हापासून आजतागायत या सरकारमध्ये विसंवाद आहे. जे पेराल तेच उगवेल, या म्हणी प्रमाणे या सरकारने महाराष्ट्रात विसंवादाची बीजे पेरली. तिच आता उगवत आहे. या सरकारला श्रेय आणि खूर्चीशिवाय काहीही दिसत नाही, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला. कर्करोग रूग्णांना धीर आणि दिलासा देण्यासाठी म्हणून गृहनिर्माण विभागाने सदनिका दिल्या. तिथेही श्रेयवादाची लढाई चांगली नाही. यांच्या आदर्शावर कोणी जाता कामा नये. राज्य निवडणूक आयोगाने 5 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 33 पंचायत समिती पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. या विरोधात भाजपने 26 जून रोजी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या आगीत राज्यातील महाविकास आघाडी सरकार जळून जाईल, असा घणाघाती आरोप मुनगंटीवार यांनी केला. ठाकरे सरकारने ओबीसी समाजावर अन्याय केला असून मराठा आरक्षण देण्यातही हे सरकार अपयशी ठरले आहे. येत्या 26 जून रोजी चक्काजाम आंदोलनात आम्ही प्रतिकात्मक शक्तीप्रदर्शन करणार आहो. मात्र, पुढे हे आंदोलन अधिक तीव्र होईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकार गेल्या 2 वर्षात कोमात असल्याप्रमाणे वागत आहे. हे सरकार कुंभकर्णापेक्षाही मोठी झोप घेत आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. सरकारचे पितळ उघडे पडू नये म्हणून फक्त दोन दिवसाचे अधिवेशन ठेवण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:51 PM 24-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here