खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राचीच छाप

0

खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात खो-खो मध्ये महाराष्ट्राला पर्याय नाही याचाच प्रत्यय पाहावयास मिळाला. महाराष्ट्राने २१ वर्षाखालील मुले व मुली या दोन्ही गटात अजिंक्यपदावर मोहोर नोंदविली आणि दुहेरी मुकूट पटकाविला. मुख्य स्टेडियमवर झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने केरळचा १६-१४ असा तीन मिनिटे राखून पराभव केला. मध्यंतराला दोन्ही संघ ९-९ अशा बरोबरीत होते. तथापि उत्तरार्धात महाराष्ट्राने पळतीमध्ये सुरेख कौशल्य दाखवित फक्त पाचच गडी गमावले. त्यामुळे त्यांच्यासाठी विजय सोपा झाला. त्यांच्या विजयात निहार दुबळे (एक मिनिट १० सेकंद, एक मिनिट ४० सेकंद व २ गडी), संकेत कदम (दीड मिनिटे, नाबाद एक मिनिट १० सेकंद व ४ गडी), दिलीप खांडवी (दोन मिनिटे व दीड मिनिट) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. केरळकडून एस.विशोग (एक मिनिट १० सेकंद व २ मिनिटे), के.सोमजित (दीड मिनिटे व एक मिनिट १० सेकंद) यांची लढत अपुरी ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here