आरटीई प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

0

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठीच्या 25 टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 11 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन प्रवेश अर्ज भरायचे असून, आणि मार्चला सोडतीद्वारे प्रवेश जाहीर केले जाणार आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून ही माहिती देण्यात आली. नवीन शाळांची नोंदणी केलेल्या शाळांची पडताळणी जानेवारी 21 ते 6 फेब्रुवारी दरम्यान केली जाणार आहे. त्यानंतर पालकांनी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया झाल्यानंतर प्रवेशासाठीची सोडत काढण्यात येईल. सोडतीद्वारे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि शाळेत जाऊन प्रवेश निश्‍चित करण्यासाठी 16 मार्च ते 3 एप्रिल अशी मुदत आहे. त्यानंतर 13 एप्रिल ते 22 मे या कालावधीत प्रतीक्षा यादीतील विद्याथ्रयांना चार टप्प्यांत प्रवेश दिले जातील. या वर्षी एकच लॉटरी काढली जाणार असून, शाळेच्या रिक्त जागेच्या संख्येइतकीच प्रतीक्षा यादी असेल, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here