‘खरे सूत्रधार ‘सिल्व्हर ओक’ आणि ‘वर्षा’वर बसलेत’

0

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर छापा टाकत आज ईडीने कारवाई केली. त्यावरुन आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा झपाटाच लावला आहे. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत असा आरोप करत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी अनिल परब आणि अनिल देशमुख हे दोघेही केवळ प्यादी असल्याचंही म्हटलं आहे. ते म्हणतात, आज ईडीची कारवाई ज्यांच्यावर झाली ते अनिल देशमुख आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले अनिल परब ही प्यादी आहेत. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसले आहेत. अशा आशयाचं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:42 PM 25-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here