कोंडगावमध्ये सर्व ग्रामस्थांची चाचणी

0

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव परिसरातील सर्व ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात ग्रामपंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह एकूण १९ जणांची चाचणी करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे सर्व ग्रामस्थांची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोंडगावमधील जनतेने चाचणी करून घेण्याचे आवाहन सरपंच बापू शेट्ये यांनी केले आहे. तसेच, हे आवाहन करतानाच त्यांनी स्वत:ही चाचणी करून घेऊन या तपासणी माेहिमेला सुरुवात करून दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:45 PM 25-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here