पुण्यातील कोरोनाच्या आढावा बैठकीला अजित पवार अनुपस्थित, चर्चांना उधाण

0

पुणे : दर आठवड्यात शुक्रवारी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जातो. मात्र, आजच्या (२५ जून) पुण्यातील कोरोना आढावा बैठकीला पुण्याचे पालकमंत्री अजित पवार गैरहजर होते. पुण्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक कौन्सिल हॉल येथे ही पार पडली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक घेतली गेली. बैठकीला पालकमंत्री अजित पवार उपस्थित नसल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. कालच वाझे प्रकरणात अजित पवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी करावी, असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडला गेला होता. तो प्रस्ताव मंजूरही करण्यात आला होता. तर दुसरीकडे पुण्यातील आंबिल ओढा प्रकरणातील विकासक अजित पवारांचा निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:40 PM 25-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here