रत्नागिरी जिल्ह्यात एक हजार ९२५ केंद्रांवर पोलिओ लसीकरण मोहीम संपन्न

0

रत्नागिरी जिल्ह्यात एक हजार ९२५ केंद्रांवर १९ जानेवारी रोजी शून्य ते पाच वयोगटातील लहान मुलांना पल्स पोलिओची लस देण्यात आली. रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते लस देऊन करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, बांधकाम आणि आरोग्य सभापती बाबू महाप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे आदी मान्यवर तसेच रोटरी क्लबचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बोल्डे म्हणाले, सन २०१३ पासून देशात पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसारख्या देशांमध्ये आजही पोलिओचे रुग्ण आढळत आहेत. ते देश भारताच्या जवळ असल्याने त्याचा प्रादुर्भाव आपल्या देशातही होऊ शकतो. अपाय होईपर्यंत वाट न पाहता आधीच उपाय करुन घेतला की अपाय होण्याची शक्यता कमी होते. दरम्यान, जिल्ह्यातील शून्य ते ५ वयोगटातील ८७ हजार ६८५ बालकांना लस पाजण्यासाठी जिल्ह्यातील रेल्वेस्थानके, बसस्थानके, चेक पोस्ट, विविध शाळा इत्यादी ठिकाणी एक हजार ९२५ केंद्रे उभारण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here