“विराट कोहलीला कर्णधारपदावरुन हटवणं क्रिकेटमधील अपराध ठरेल”

0

मुंबई : संपूर्ण आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने उत्कृष्ट प्रदर्शन दाखवले. दोन वर्ष अप्रतिम खेळ करत ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या संघाना पराभूत करुन अंतिम सामना गाठला. मात्र अंतिम सामन्यात पोहोचलेला भारतीय संघ न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभूत झाला. ज्यानंतर कर्णधारपद भूषवत भारताला इथवर घेऊन आलेल्या विराट कोहलीवरच राभवचं सर्व खापर फोडलं जाऊ लागलं. मात्र असे असतानाच इंग्लंडचे माजी दिग्गज फिरकीपटू ग्रेम स्वान यांनी विराटचे समर्थन करत अशावेळी ‘कोहलीला कर्णधार पदावरुन हटवणं म्हणजे क्रिकेटमधील अपराध ठरेल’ असं वक्तव्य केलं आहे.

विराट कोहली कर्णधार झाल्यापासून भारतीय संघ तीन मोठ्या आय़सीसी टूर्नांमेंटमध्ये खेळला. यात पहिले 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी, नंतर 2019 विश्व चषक आणि आथा 2021 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप. मात्र या तिन्हीमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला. ज्यात 2017 आणि 2021 मध्ये अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने कोहलीच्या कर्णधारीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उठवले जात आहेत. कोहली एक चांगला खेळाडू असला तरी कर्णधार म्हणून चांगला नसल्याची प्रतिक्रिया अनेकजण देत असून कोहलीला कर्णधारपदावरुन हटवण्याची मागणी करत आहेत. मात्र इंग्लंडचे माजी दिग्गज फिरकीपटू ग्रेम स्वान यांनी कोहलीची बाजून घेत त्याचे समर्थन केले आहे. स्वान स्पोर्ट्सकिडाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ते म्हणाले ”विराट कोहली एक चॅम्पियन आणि सुपरस्टार आहे. त्याने भारतीय संघाला मजबूत बनवलं आहे. प्रत्येक विकेटनंतर कोहलीचा जोश बघण्याजोगा असतो. तो संपूर्ण सामन्यात संघाचा आत्मविश्वास वाढवून स्वत:ला 100 टक्के समर्पित करतो. त्यामुळे इतका चांगला कर्णधार असताना त्याला हटवण्याची काही गरज नाही. असे करणे क्रिकेटमधील अपराध होऊ ठरेल.”

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:40 PM 25-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here