रत्नागिरी माईंड केअर तर्फे बॉर्न टू विन कार्यशाळेचे आयोजन

0

रत्नागिरी माईंड केअर रत्नागिरी व बॉर्न टू विन तर्फे २५ व २६ जानेवारी रोजी बॉर्न टू विन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आजचे युग स्पर्धेचे युग आहे. प्रत्येकालाच आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असत. परंतू सर्वांनाच यश भेट नाही. सर्वजणच स्वप्ने पाहतात परंतू काहीजणच ती सत्यात उतरवतात. आपण किंवा आपले मुल बऱ्याच वेळी पूर्ण प्रयत्नही करतो परंतू तरीही तो अयशस्वी होतो. त्यामुळे स्वतःला किंवा आपल्या पाल्याला कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर यशस्वी लोक यशस्वी होण्यासाठी काय करतात हे शिकणे ही पहिली व सर्वात महत्वाची पायरी आहे. यासाठी ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. याअंतर्गत ध्येय कसे ठरवावे. त्याचा प्लॅन कसा करायचा, यशस्वी होण्यासाठी अभ्यास काय कसे करायचे, विनर mindset कसा तयार करायचा, यशस्वी होण्यासाठी आवश्यक दृष्टीकोन कसा तयार करायचा यासोबतच वेळेचे नियोजन कसे करायचे स्वयंशिस्त का व कशी लावायची स्वतःचा विकास का व कसा करत राहायचा या गोष्टी शिकवल्या व करुन घेतल्या जाणार आहेत. डॉ. अतुल ढगे ही कार्यशाळा घेणार आहेत. आत्तापर्यंत अनेक कार्यशाळा त्यांनी रत्नागिरी येथे घेतल्या असून रत्नागिरीत अशा प्रकारची कार्यशाळा प्रथमच आयोजित करण्यात आलेली आहे. ही कार्यशाळा दि. २५ व २६ जानेवारी रोजी १० ते ६ वाजेपर्यंत माईंड केअर हॉस्पिटल माळानाका रत्नागिरी येथे घेतली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here