डेल्टा प्लस व्हेरिंएंट सापडलेल्या एका महिलेचा मृत्यू, आठ रूग्णांची प्रकृती स्थिर

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील नऊ कोरोनाबाधित रूग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला होता. त्यापैकी संगमेश्वर तालुक्यातील 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने आज दिली. डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडलेले इतर आठ रूग्ण उपचार घेऊन घरी आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान डेल्टा प्लस रूग्ण सापडलेल्या पाच गावांमध्ये कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आला असून परिसरातील ग्रामस्थांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:23 PM 25-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here