जिल्हा नियोजन बैठकीत रायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी

0

रायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा आराखडा आज जिल्हा नियोजन बैठकीत मंजूर करण्यात आला असून 45 कोटींचा वाढीव निधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करणार असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्ह्यात नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येणार असून यामध्ये स्पीड बोट अॅम्बुलन्स अंगणवाडी बांधकाम, मुलींना सायकल वाटप, स्मशानभूमी शेड, घनकचरा व्यवस्थापन कामे, नगरपालिका, नगरपंचायत सीसीटीव्ही बसविणे ही घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन भवनात जिल्हा नियोजन समिती बैठक पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार रवींद्र पाटील, राजीप अध्यक्ष योगिता पारधी, जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, सदस्य, सर्व अधिकारी बैठकीला उपस्थित होते. जिल्हा नियोजन बैठकीनंतर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.जिल्हा नियोजन समिती बैठकीत जिल्ह्याचा 247.57 कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असून 45 कोटी वाढीव निधीची मागणी नाविन्यपूर्ण योजनेसाठी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत जिल्ह्यातील 1200 हून अधिक स्मशानभूमीना शेड नाहीत त्यांना जनसुविधा अंतर्गत शेड लावून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपालिका मध्ये सीसीटीव्ही लावले नाहीत त्यासाठी निधीची मागणी शासनाकडे करत आहोत. नागरी सुविधा अंतर्गत येणाऱ्या निधीतून पाच हजार लोकवस्ती असलेल्या ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापन बाबत कामे सुचविण्याच्या सूचना केल्या असून लगतच्या ग्रामपंचायतींनाही यात सामावून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. अंगणवाडीसाठी उपलब्ध होत असलेल्या निधीतून ज्या गावात अद्यापही अंगणवाडीची इमारत नाही त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नावीन्य पूर्ण योजने अंतर्गत स्पीड बोट अंबुलन्ससाठी पाच कोटींची मागणी शासनाकडे करीत आहोत. जेणेकरूम अतिदक्ष रुग्णांना मुंबई येथे बोटीने नेऊन त्वरित उपचार मिळणे शक्य होणार आहे. याबाबतची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पाच ते सहा किलोमीटर पर्यत शाळा प्रवास करणाऱ्या मुलींना सायकल वाटप करण्याची योजना नावीन्य पूर्ण योजनेत घेतली आहे. असल्याचेही पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here