अनिल देशमुख आज ईडी चौकशीला जाणार नाहीत

0

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) चौकशीसाठी समन्स धाडले होते. त्यानुसार अनिल देशमुख यांना आज सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात हजर राहणार नसल्याचं त्यांचे वकील अॅड. जयवंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ईडीकडून अनिल देशमुख यांना पाठवण्यात आलेल्या समन्समध्ये कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नाही. नेमकं कोणत्या मुद्द्यावर चौकशी केली जाणार आहे याची माहिती कळवली जावी याबाबतचा अर्ज ईडीच्या कार्यालयात दाखल केला आहे, अशी माहिती अॅड. नेमकं कोणत्या मुद्द्यावर चौकशी केली जाणार आहे याची माहिती कळवली जावी याबाबतचा अर्ज ईडीच्या कार्यालयात दाखल केला आहे, अशी माहिती अॅड. जयवंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आज अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:11 PM 26-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here