मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची 31 जुलै रोजी भेट घेणार असल्याचं समजतंय. ईव्हीएमच्या मुद्द्यावर देशपातळीवर मोठं आंदोलन उभं करण्यासाठी राज ठाकरे ममतांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे 3 दिवसांसाठी कोलकाता दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर राज ठाकरे आणखी काही महत्वाच्या नेत्यांची भेट घेऊन ईव्हीएमच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत. दरम्यान, दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर आम्हाला आयोगाकडून फारशी अपेक्षा नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती.
