सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांसमवेत ‘परीक्षेवर चर्चा २०२०’ कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मोदी यांनी बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. दहावी बारावी मंडळाच्या परीक्षा सुरु होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ताण न घेता परीक्षेत बसण्याचा सल्ला मोदींनी दिला. मोदींनी शिक्षणाशी संबंधित अनेक खास गोष्टी सांगितल्या. दरम्यान ‘परीक्षेवर चर्चा’ संदर्भात बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. ट्विटच्या माध्यमातून अभिनेता प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींना त्यांची पदवी दाखविण्यास सांगितले आहे. प्रकाश राज नेहमी वर्तमान विषयावर आपले मत जनतेसमोर मांडत असतात. आपल्या ट्विटर हँडलवर त्यांनी लिहिले आहे की, ‘परीक्षेवर चर्चा करण्यापूर्वी डिग्री पेपर दाखवा …’
