रत्नागिरीतील पहिला ब्राईडल शो शनिवार दिनांक १८ जानेवारी रोजी रत्नागिरी खबरदार प्रस्तुत वूमेन्स कार्निव्हल मध्ये पार पडला. या ब्राईडल शो मध्ये रत्नागिरीतील नामवंत पार्लरनी भाग घेतला होता. अत्यंत देखण्या आणि सुंदर नियोजनात पार पडलेल्या या स्पर्धेत लॅव्हीश ब्युटी पार्लरच्या रसिका जोशी यांनी पहिल्या क्रमांकाचे १० हजार रुपयांचे रोख बक्षीस पटकावले. द्वितीय क्रमांक ब्युटी झोनच्या प्रणाली पवार यांना तर तृतीय क्रमांक शिवम हेअर अँड ब्युटीचे शिवम शिंदे यांनी पटकावला.


रत्नागिरीत आजवर इतक्या दर्जाचा कार्यक्रम झालाच नाही अशी प्रतिक्रिया उपस्थित प्रेक्षकांनी दिली. या स्पर्धेत रत्नागिरीतील नामवंत १६ पार्लरनी भाग घेतला होता. स्पर्धेच्या नियमानुसार प्रत्येक पार्लरला २ वधू सजवून आणायच्या होत्या. आपण किती चांगल्या पद्धतीने या वाधुंचा साजशृंगार करू शकतो हे प्रत्येक पार्लरला या स्पर्धेत दाखवायचे होते.

प्रचंड मेहनत करून ३२ वधू सजून नटून या स्पर्धेच्या ठिकाणी आल्या होत्या. प्रेकाकांना अशा पद्धतीने नटलेल्या सौंदर्यवतींचे सौंदर्य पाहण्यासाठीचा हा एक विलक्षण सोहळाच होता. स्पर्धेच्या दोन फेऱ्या घेऊन यामधून अंतिम विजेता निवडण्यात आला. या स्पर्धेत लॅव्हीश ब्युटी पार्लरच्या रसिका जोशी यांनी पहिल्या क्रमांकाचे १० हजार रुपयांचे रोख बक्षीस पटकावले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पेडणेकर ज्वेलर्स चे श्री. मांडवकर, उद्योजक सौरभ मलुष्टे, रत्नागिरी खबरदारचे संपादक हेमंत वणजु व खबरदार महिला कमिटीच्या उपस्थितीत करण्यात आला. विजेत्यांना रोख बक्षीस व मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश बंदरकर यांनी केले.