ब्रेकिंग : हॉटेल ताजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल; घटनास्थळी बीडीडीएसचे पथक दाखल

0

मुंबई : २१ जूनला मंत्रालयात बॉम्ब ठेवणार असल्याचा इमेल प्राप्त झाल्यानंतर आता कुलाबा परिसरात पर्यटकांना आकर्षून घेणाऱ्या हॉटेल ताजला देखील बॉम्ब ठेवल्याचा कॉल प्राप्त झाला आहे. कुलाबा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक बॉम्ब नाशक आणि शोधक पथक (बीडीडीएस) हॉटेल ताज परिसरात पोहचले असून सर्च ऑपरेश सुरु आहे. बीडीडीएसच्या तीन गाड्या घटनास्थळ रवाना झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.२६/११ मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात देखील हॉटेल ताजला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. त्यामुळे आलेल्या कॉलची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांचे पथक सर्च ऑपरेशन करत आहे. तसेच हॉटेलच्या आत हॉटेल ताजची खाजगी सुरक्षा देखील असल्याने ती यंत्रणा देखील कामाला लागली आहे. हॉटेल ताजला हॉटेलात बॉम्ब ठेवल्याचा निनावी कॉल कोणी केला, याचा तपास कुलाबा पोलीस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:02 PM 26-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here