ट्वेंटी-२० वर्ल्ड कप भारताबाहेर होणार?; बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स

0

इंडियन प्रीमिअर लीग २०२१चे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कपही भारताबाहेरच होण्याची शक्यता बळावली आहे. देशातील कोरोना परिस्थिती पाहता ट्वेंटी-२० वर्ल्ड कपही यूएईत खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत आले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनही कदाचित ट्वेंटी-२० वर्ल्ड कप यूएईत खेळवला जाऊ शकतो असे सांगितले.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या तीन कोटींच्या घरात गेली आहे. २०२०-२१ मध्ये देशातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली होती, परंतु एप्रिल व मे या महिन्यात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं. एका दिवसाला ४ लाख रुग्णांची भर पडल्याचे आकडेवारी सांगते. आयपीएल २०२१साठी बीसीसीआयनं तयार केलेलं सुरक्षित बायो बबलमध्येही कोरोनानं शिरकाव केला अन् एकामागून एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे स्पर्धा स्थगित करावी लागली.

”देशातील कोरोना परिस्थिती पाहता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप यूएईत शिफ्ट केला जाऊ शकतो. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा महत्त्वाचे आहे. लवकरच आम्ही याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करू,”असे जय शाह यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:15 PM 26-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here