मंगळुरू येथील बाजपे विमानतळावर आढळला बॉम्ब

0

मंगळुरू येथील बाजपे विमानतळावर बेवारस लॅपटॉप बॅग सापडली. त्यात बॉम्ब सपाडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे देशातील विमानतळांवर सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. विमानतळाच्या बाहेर हा बॉम्ब आढळून आला.रिक्षातून आलेल्या दोघांनी महत्वाच्या व्यक्तींसाठी असणाऱ्या पार्किंगच्या जवळील तिकीट काउंटरजवळ ही बॉम्ब असलेली बॅग ठेवली. सकाळी पावणे आठच्या सुमारास ही बाब उघडकीस आल्यानंतर ही बॅग निर्जन स्थळी नेण्यात आली. बॉम्बनाशक पथक आणि श्‍वान पथक घटनास्थळी रवाना झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मंगळुरूचे पोलिस आयुक्त पी. एस. हर्ष आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळावर पोहोचले. त्यानंतर मेटल डिटेक्‍टर, बॉम्ब शोधक पथक आणि श्‍वान पथकाच्या सहाय्याने परिसराची कसून तपासणी करण्यात आली. सीआयएसएफला ही संशयास्पद बॅग सापडली. सुरक्षेचे निकष पाळून तिला हलवण्यात आले. तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाल माहिती देण्यात आली. नागरिकांना या बॅगपासून दूर थांबवण्यात आले होते. परिस्थिती नियंत्रणाखाली असून आम्ही सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजना करत आहोत. बॅग ठेवणऱ्या दोन व्यक्‍ती रिक्षातून आल्याचे सांगण्यात येत आहे, त्याबाबत आम्ही सीसीटिव्ही फुटेज पडताळून पहात आहोत. दरम्यान, बॉम्बची भीती लक्षात घेऊन विमानतळाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तर बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here