तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख एकत्र चित्रपटगृहात; निमित्त ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’

0

छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहांमध्ये गर्दी खेचत आहे. पहिल्या आठवड्यातच 100 कोटींचा गल्ला जमवणारा हा चित्रपट आता 200 कोटींकडे वेगाने सरकत आहे. अंगावर रोमांच उभा करणारा हा चित्रपट पाहण्यासाठी सामान्य लोकांसह तिन्ही सैन्यदलाचे प्रमुखही चित्रपटगृहामध्ये पोहोचले. यामुळे भारावलेल्या अजय देवगण याने आभार व्यक्त केले आहेत. ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण याने सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री काजोल आणि सैफ अली खानही दिसतो. देशाचा हा धगधगता इतिहास पाहण्याची इच्छा तिन्ही सैन्यदलाचे प्रमुखही मोडू शकले नाही. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग आणि हवाईदल प्रमुख एअरचिफ मार्शल राकेश कुमारसिंह भदौरिया यांनी रविवारी एकत्रच हा चित्रपट पाहिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here