‘त्या’ चोरट्यांकडून चोरीची कबुली

0

रत्नागिरी : शहरातील आठवडाबाजार येथील दुकानाचे शटर उचकटून टेबलमधील ४५८ रुपये चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांनी डेंटल क्लिनिकमधील संगणकाची स्क्रीन चोरीचीही कबुली दिली. दिनेश लीलाराम(३३), चंपालाल सरगरा(४०) आणि सुरेशकुमार सरगरा (२९, सर्व सध्या रा. रामआळी, मूळ रा. राजस्थान) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत केशव हरी इंदुलकर (६८, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) आणि तुषार चोपराम रहेले (२७, रा. पाथरे कॉम्प्लेक्स गाडीतळ) यांनी तक्रार दिली होती. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:14 PM 28-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here