घरात घुसून मोबाईल लांबवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

0

रत्नागिरी : एक वर्षांपूर्वी चिपळूण येथील घरात घुसून २५ हजार रुपयांचा मोबाईल लांबवणाऱ्याच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आवळल्या. राजकुमार शंकरलाल पटेल (३०, मूळ रा. मध्यप्रदेश, सध्या रा. खेर्डी, चिपळण) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत समीक्षा मधुकर भुरण यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, ११ मे २०२० रोजी त्यांच्या घरातून अज्ञाताने मोबाईल चोरून नेला होता. त्यांनी तक्रार दिल्यानंतर चिपळूण पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा समांतर तपास करत होते. तेव्हा त्यांना स्थानिक गुन्हे शाखेस मिळालेल्या माहितीवरून त्यांनी राजकुमारला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विकास चव्हाण, पोलिस हवालदार संजय कांबळे, पोलिस नाईक विजय आंबेकर, सागर साळवी, दत्ता कांबळे यांनी केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:45 PM 28-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here