राज्यभरात रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा झाली. शिक्षकांची परीक्षा घेणारी यंत्रणा यंदाही तांत्रिक दोषांमुळे नापास झाली आहे. दोन्ही पेपरमध्ये ढीगभर चुका झाल्याने परीक्षार्थी गोंधळून गेले होते. आता निकालावेळी सदोष प्रश्न रद्द केले जाण्याची शक्यता असून लाखो उमेदवारांना हक्काचे गुण गमवावे लागणार आहेत.
