मुंबई |‘बिग बॉस मराठी’च्या सीझन 2 मध्ये सर्वाधीक चर्चेत असलेला स्पर्धक अभिजीत बिचुकले बिग बॉसच्य घरात पुन्हा एन्ट्री करणार आहे. अभिजीत बिचुकले आज( सोमवार)रात्रीच्या भागात पुन्हा बिग बॉसच्या घरत दिसणार असल्याचं समजतंय. चेक बाऊन्स प्रकरणी गेल्या महिन्यात सातारा पोलिसांनी अभिजीत बिचुकलेला ‘बिग बॉस मराठी’च्या सेटवरून ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, अभिजीत बिचुकलेला आता जामीन मिळाल्याने तो पुन्हा ‘बिग बॉस’च्या घराच एन्ट्री घेण्यास सज्ज झाला आहे.
