संसदेचं पावसाळी अधिवेशन 19 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होण्याची शक्यता

0

संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालण्याची शक्यता आहे. संसदेच्या कामकाजाच्या मंत्रिमंडळ समितीने (सीसीपीए) याबाबतची शिफारस केली आहे. देशातील कोरोनाच्या संकटकाळात अधिवेशन होणार आहे. त्यामुळे सर्व खासदारांना कोरोनावरील लसीचे दोन डेस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यसभेतील 232 पेकी 179 खासदारांना कोरोनाचे दोन डोस देण्यात आले आहेत. तर लोकसभेतील 540 सदस्यांपैकी 403 खासदरांना लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. या अधिवेशनात कोरोना संकटात जनसेवेसाठी विशेष कार्य केलेल्या खासदरांना संसदेत आपले अनुभव मांडण्यासाठी विशेष वेळ देण्यात येणार आहे. आपल्या लोकसभा क्षेत्रात कोरोना संकटकाळात केलेल्या विशेष कामांचा अनुभव आणि त्याचे फोटो अध्यक्षांच्या कार्यालयात पाठवण्याचे आवाहन लोसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदरांना केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:19 PM 29-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here