गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर यांना रस्त्याच्या दुरवस्थेबाबत निवेदन दिले. भातगाव कदम दुकान ते चाफेवाडी रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर, अविनाश वाघे, तेजस पोफळे, रुपेश घवाळे, अकलेश गुप्ता व कायकर्ते उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:27 PM 30-Jun-21