राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईचा आंतरराष्ट्रीय मास्टर नुबेरशहा शेख ठरला विजेता

0

रत्नागिरी येथील चेसमेन संस्थेने आयोजित केलेल्या आर. बी. सप्रे स्मृती फिडे मानांकन राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईच्या मोहम्मद नुबेरशहा शेख याने ८.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. पुण्याचा फिडेमास्टर निखिल दीक्षितने ८ गुणांसह उपविजेतेपद मिळवले. दैवज्ञ भवन येथे दोन दिवस स्पर्धा झाली. नुबेरशहाने कोल्हापूरच्या सम्मेद शेटे याचा पराभव करून २५ हजार रुपये पारितोषिकासह सप्रे चषक पटकावला. सम्मेदला ७ गुणांसह सहाव्या स्थानावर जावे लागले. तमिळनाडूचा आंतरराष्ट्रीय मास्टर आर. बालसुब्रह्मण्यम व निखिल दीक्षित यांनी डावात धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडवला. अर्ध्या गुणासह निखिलने १७ हजार रुपयांचे पारितोषिक व उपविजेतेपद मिळवले. बालसुब्रह्मण्यमला ७.५ गुणांसह ११ हजार रुपयांचे तृतीय क्रमांकांचे पारितोषिक मिळाले. पुष्कर डेरे याने कोल्हापूरच्या श्रीराज भोसले याचा पराभव केला. पुष्करने ७.५ गुणांसह ८ हजार रुपयांचे पारितोषिक व चौथे स्थान मिळवले. कोल्हापूरचा अनिश गांधीने पुण्याचा फिडेमास्टर अनिरुद्ध देशपांडेचा पराभव केला. त्याला ७.५ गुणांसह ६ हजार रुपयांचे पारितोषिक व सहावे स्थान मिळाले. अनिरुद्धला ३ हजार रुपयांचे पारितोषिक व सातवे स्थान मिळाले. नीलेश माळी व रत्नागिरीच्या ओम लामकाणे यांनी धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडवला. दोघांनाही ६.५ गुण मिळाले. ओमला बारावा, नीलेशला तेरावा क्रमांक मिळाला. मुंबईचा संजीव मिश्राने सोहम पवारचा पराभव करून ७ गुणांसह २५०० रुपयांचे पारितोषिक व आठवे स्थान मिळवले. ओम कदमने गोवर्धन वासवे याचा पराभव करून ७ गुणांसह नववे स्थान मिळवले. मुंबईच्या केतन बोरुचाने गोव्याच्या आर्यन रायकरचा पराभव करून ६.५ गुणांसह दहावे स्थान मिळवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here