प्राध्यापकांसाठी गुड न्यूज: 3 हजार जागांच्या भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात; लवकरच जाहिरात निघणार

0

जालना : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात लवकरच प्राध्यापकांच्या जागांसाठी मोठी भरती होणार अशी घोषणा केली होती. त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले प्राध्यापक सुखावले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता या भरतीची कार्यालयीन प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे आणि लवकरच या संबंधीची जाहिरातही प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत दिली आहे. ते सध्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जे प्राध्यापक तासिका तत्वावर आहेत त्यांच्यासाठीही काहीशी दिलासादायक माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा तास आता 60 मिनीटाऐवजी 48 मिनिटांचा करण्यात आला आहे. तर युजीसाठीचं मानधन 500 वरून 625 तर पीजी आणि लॉसाठी 600 वरून 750 रुपये इतकं वाढवण्यात आलं आहे. याबरोबरच विद्यपीठाच्या 629 पदांची आणि ग्रंथपालांची 121 पदांची देखील भरती होणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान संवर्ग बदली करून भरती करायचं असेल तर त्यात किमान दीड वर्ष जाईल त्यामुळे सदर प्राध्यापक भरती ही पारंपरिक पद्धतीनेच केली जाणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. मात्र, आदिवासी मंत्रालय, ओबीसी मंत्रालय, सामाजिक न्याय मंत्रालय यांनी तसा प्रस्ताव पाठवल्यास पुढच्यावेळी संवर्ग बदली करून भरती करू असंही उदय सामंत म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
5:32 PM 30-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here