प्रजासत्ताकदिनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष राजपथावर होणाऱ्या संचलनाचे प्रमुख पाहुणे असणार

0

दरवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी खास तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या संचलनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार, याची उत्सुकता सर्वांनाच असते. येत्या रविवारी, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोलसोनारो येणार आहेत. मंगळवारी औपचारिकपणे केंद्र सरकारकडून याची घोषणा करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी भारताकडून मित्र आणि सहयोगी देशांच्या प्रमुखांना भारतात निमंत्रित केले जाते. या दिवशी राजपथावर होणाऱ्या संचलनाचे तेच प्रमुख पाहुणे असतात. आतापर्यंत विविध देशांचे प्रमुख या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे सुद्धा प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनासाठी आले होते. ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष मायकल टेमर हे ऑक्‍टोबर 2016 मध्ये ब्रिक्‍स देशांच्या परिषदेसाठी भारतात आले होते. तर गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये नरेंद्र मोदी याच वार्षिक परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलला गेले होते.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here