“तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही”

0

मुंबई : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर काल (३०जून) सोलापुरात असतांना दगडफेक झाली होती. तर पडळकर हे ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यात घोंगडी बैठकीसाठी सोलापुरात गेले होते. त्यावेळी पडळकर यांच्या ताफ्यावर दगडफेड झाल्याची घटना घडली. तर या संपूर्ण घटनेनंतर आता राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत. भाजप नेते निलेश राणे यांनी आता संतापजनक भूमिका घेत तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, असा इशाराच निलेश राणे यांनी दिला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची एक काच फोडून जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठा पराक्रम केला तर एवढं समजून चला जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, असा सूचक इशारा देत तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही,अस वक्तव्य निलेश राणेंनी केलं आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा सिसिटीव्ही कॅमेरात आठवून आला आहे, तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशी घोषणा देत गाडीवर मोठा दगड टाकून तिथून पळ काढला गेल्या असल्याचं समजतये पडळकर समर्थकांनी मोटारसायकलवर पाठलाग केल्यानंतर सुद्धा दगडफेक करणारा हाती लागला नाही. सोलापुरातील श्रीशैल्य नगर अक्क महादेवी मंदिर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:24 PM 01-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here