कॅनडात उष्णतेची लाट: १३० जणांचा मृत्यू; तापमान ४९ अंशांवर

0

ओटावा : कॅनडामध्ये अचानक आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे गेल्या शुक्रवारपासून तिथे १३० जण मरण पावले आहेत. मृतांमध्ये बहुतांश व्यक्ती वयस्कर आहेत. त्यातील काही जण विविध व्याधींनी जर्जर होते. उष्णतेची लाट येण्यामागे ग्लोबल वॉर्मिंगसोबतच इतरही कारणे आहेत, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. कॅनडामध्ये सलग तिसऱ्या दिवशी काही ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. लिटन या गावामध्ये मंगळवारी ४९.६ सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. कॅनडाचा पश्चिम भाग तसेच अमेरिकेच्या काही भागात उष्णतेची लाट आली आहे. रविवारच्या आधी कॅनडामध्ये ४५ सेल्सिअसच्या पुढे कधीही तापमान गेले नव्हते. व्हँकुव्हर शहरामध्येच शुक्रवारपासून उष्णतेच्या लाटेमुळे ६५हून अधिक जण मरण पावले आहेत.

कॅनडातील लिटन या गावातील रहिवासी मेगन फँडरिच यांनी सांगितले की, हवेत इतका उष्मा वाढला आहे की, त्यामुळे घराबाहेर जाऊन कोणतेही काम करणे अशक्य झाले आहे. उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया भागामध्ये याआधी उष्ण तापमान फारसे वाढत नसे. त्यामुळे अनेक घरांमध्ये एसी बसविलेले नाहीत; पण गेल्या शुक्रवारपासून उष्णतेच्या लाटेत तापमान ४७ ते ४९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्यानंतर या रहिवाशांचे खूपच हाल झाले आहेत.

वणवे लागण्याचाही मोठा धोका
कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया, अल्बेर्टा, सॅस्काचेवान, मॅनिटोबा या भागांमध्ये उष्णतेची लाट आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे, असे तेथील पर्यावरण तज्ज्ञांनी म्हटले आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे या भागांतील जंगलात वणवेही लागू शकतात. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता तेथील अग्निशमन दल सतर्क झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:38 PM 01-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here