शिवसेनेचा खऱा चेहरा समोर आला, फडणवीसांच्या या विधानाला सेनेचं प्रत्युत्तर

0

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या गौप्यस्फोटानंतर शिवसेनेचा खऱा चेहरा समोर आला अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यालाच शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेनं जे केलं ते खुलेआम केलं. आपल्याच सहकारी पक्षातील लोकांचं आणि आपल्याच पक्षातील नेत्यांचं छुप्या पद्धतीने खच्चीकरण करण्याचे कारनामे कधी उद्धव ठाकरेंनी केले नाहीत, असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. भाजप जर पूर्ण बहुमतात सत्तेत आल्यावर शिवसेनेचे खच्चीकरण करू पाहत आहे हे लक्षात आल्यावर शिवसेनेनं आपला स्वतंत्र बाणा जपून राजकीय सोयरीक करण्याचा प्रयत्न केला असला तर त्यात वावगं काय?, असा सवाल कायंदे यांनी फडणवीसांनी केला आहे. दरम्यान, भाजप, शिवसेना जेव्हा वेगवेगळे लढले तेव्हाही शक्तीमान भाजपला बहुमत मिळालं नव्हतंच. केवळ 122 आमदारांच्या जोरावर तेव्हा आपण सत्ता स्थापन केली तेव्हा कोणते अदृ्ष्य हात आपल्या मागे होते ते सांगा, असा टोला मनीषा कायंदे यांनी फडणवीसांना लगावला आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here