सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर पडळकर समर्थकांचा हल्ला

0

सोलापूर : सोलापुरात काल (30 जून) गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणारा तरुण मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारांचा शोध सुरु असतानाच सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर पडळकर समर्थकांनी हल्ला केला आहे. दोन तरुणांनी हातात दगड घेऊन कार्यालयाची काच फोडण्याचा प्रयत्न केला तसेच यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील केली.

शरणू हांडे, सोमनाथ घोडके अशी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या दोघा तरुणांची नावं आहेत. हे दोघे स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. काल पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आपण हे पाऊल उचललं आहे. आम्ही पळून न जाता स्वतः पोलीस स्टेशनला जातोय, असं शरणू हांडे याने सांगितलं. काल पडळकर यांच्या गाडीवर राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने मोठा दगड घालून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्याला अद्याप अटक केलेली नाही. त्या निशेधार्थ आम्ही राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं, असं शरणू हांडेनं म्हटलं आहे.

सोलापुरात काल (30 जून) गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची काच फुटली आहे. सोलापुरातील मड्डी वस्ती इथे हा प्रकार घडला आहे. गोपीचंद पडळकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:03 PM 01-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here