महाविकास आघाडी सरकारने केलेली कर्जमाफी फसवी – राजू शेट्टी

0

जे शेतकऱ्यांच्या विरोधात, मी त्यांच्या विरोधात, असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलं आहे. तसेच त्यांनी शेतकरी कर्जमाफीवरुनही सरकारवर टीका केली आहे. ते सिंधुदुर्ग येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडी सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असल्याचं शेट्टी म्हणाले आहेत. तसेच सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत सापडला असून त्याला आधाराची गरज आहे. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणाकडेही वेळ नाही. कोकणातील शेतकरी संकटांचा सामना करत आहे. अशावेळी सरकारने केलेली कर्जमाफी तकलादू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात जो आहे मी त्याच्या विरोधात आहे. शेतकऱ्यांना विरोध करणाऱ्यांना सोडणार नाही, असं शेट्टी म्हणाले आहेत. तसेच शेती विकू नका, शेतीची कास धरा, असंही ते म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here