55 वर्षांनंतर पहिल्यांदा भारताचा संघ पाकिस्तानला जाणार

0

नवी दिल्ली : भारतीय टेनिस संघ प्रतिष्ठित डेव्हिस कप स्पर्धा खेळण्यासाठी 55 वर्षांनंतर पहिल्यांदा पाकिस्तानला जाणार आहे. ऑल इंडिया टेनिस असोसिएशनचे (एआईटीए)  महासचिव हिरण्मय चॅटर्जी यांनी रविवारी याची माहिती दिली. ही द्विपक्षीय मालिका नसून, जागतिक स्पर्धा असल्याचे ते म्हणाले. आम्ही पाकिस्तानला जाणार आहोत. ही द्विपक्षीय मालिका नाही. ही टेनिसमधील विश्‍वचषक स्पर्धा आहे व त्यासाठी आम्हाला जावे लागेल. याबाबत केंद्र सरकारसोबत कोणतीच चर्चा झालेली नाही. कारण, ही एक जागतिक स्पर्धा आहे आणि आम्हाला ऑलिम्पिक चार्टर मानावा लागेल, असे एआईटीएचे महासचिव म्हणाले. सहा खेळाडूंचा संघ, सपोर्ट स्टाफ आणि प्रशिक्षक पाकिस्तानात जातील. मी स्वतः संघासोबत जाणार आहे. आम्ही प्रत्येकासाठी व्हिसा आवेदन करणार आहोत. पाकिस्तान हॉकी संघ वर्ल्डकपसाठी भारतात आला होता व आता आम्ही जाऊ, असे ते म्हणाले. डेव्हिस कपचा ड्रॉ यावर्षी फेब्रुवारीत निघाला होता; पण 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय संघांच्या पाकिस्तान जाण्याबाबत अनिश्‍चितता होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here