टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना

0

ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना झाला आहे. टीम इंडियाच्या बहुतांश खेळाडूंनी एकसाथ न्यूझीलंड दौऱ्यासाठी उड्डाण घेतले. टीम इंडिया न्यूझीलंडच्या दौऱ्यामध्ये पाच टी-20 सामने, तीन एक दिवसीय सामने आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण असणार आहे. न्यूझीलंडमध्ये टी-20 लढती रात्री 8 वाजता (हिंदुस्थानी वेळेनुसार रात्री साडेबारा) सुरू होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here