गिम्हवणे येथील काेविड सेंटरचे आमदार याेगेश कदम यांच्या हस्ते उद‌्घाटन

0

दापोली : गिम्हवणे ग्रामपंचायतीचा कोविड सेंटर सुरू करण्याचा उपक्रम या साथीच्या काळात गरजेचा व कौतुकास्पद असून, आपण यासाठी लागेल ते सहकार्य करू, अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी यावेळी दिली. त्याचाच भाग म्हणून ऑक्सिजन कॉन्संट्रेटरच्या दोन मशीन आपण आवश्यकतेनुसार देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या आदर्श केंद्रशाळेत पार पडला. दापोली शहराजवळ असलेल्या गिम्हवणे ग्रामपंचायतीच्या कोविड सेंटरचे उद्घाटन आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. हे कोविड सेंटर ३० बेडचे आहे. यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार वैशाली पाटील, तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे, गिम्हवणे वणंद ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी गिम्हवणेकर, उपसरपंच किशोर काटकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष मारकड, सुनील दळवी व सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी सरपंच साक्षी गिम्हवणेकर यांच्या हस्ते आमदार योगेश कदम व मान्यवरांचा गौरव करण्यात आला. सरपंच साक्षी साळवी यांनी सांगितले की, ग्रामस्थांच्या सहकार्याने व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने हे कोविड सेंटर उभे राहिले आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणून ते लवकर बंद होईल, अशी आमची इच्छा व प्रयत्न असतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. माजी उपसरपंच, ग्रामदेवस्थान अध्यक्ष शंकर साळवी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:21 PM 02-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here