सव्वा आठ लाखांच्या तांब्याच्या वायर चोरीप्रकरणी दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0

रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ झाराप येथील एल ऍण्ड टी कंपनीच्या गोडावूनमधून ८ लाख २५ हजार ६३६ रुपये किंमतीचे १५०० किलो वजनाचे बंडल चोरणाऱ्या व त्याची रत्नागिरीत विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी आवळल्या आहेत. या प्रकरणी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे फुरखान राजूद्दिन मलिक (रा. उ. प्रदेश) व सुर्यकांत बसंत कुमार पानी (रा. ओडीसा) अशी नावे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण रेल्वेसाठी एल ऍण्ड टी कंपनी इलेक्ट्रिकचे काम करीत असून सध्या कंपनीच्या वतीने रोहा ते मडगांव असे इलेक्ट्रीकचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारी प्युअर तांब्याची कंपनीने आपल्या गोडाऊनमध्ये ठेवली होती त्यापैकी कंपनीच्या झाराप येथील गोडावून ठेवलेल्या वायरच्या बंडला पैकी आरोपींनी या गोडावूनमधून १५०० किलो वजनाचे हे तांब्याच्या वायरचे बंडल चोरले जेसीबीच्या सहाय्याने उचलून ते रत्नागिरी येथे दांडेआडोम येथे मिरजोळे येथील पाटील यांच्या जागेत आणून ठेवले होते. त्यानंतर या दोन्ही आरोपींनी हा माल विकण्याचा प्रयत्न केला. याची खबर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शिताफीने तपास करून आरोपींना मुद्देमालासकट ताब्यात घेतले व माल जप्त केला. या सर्व प्रकारात आणखी एक आरोपी आहे. त्याला लवकरच ताब्यात घेतले जाणार आहे. या सर्व प्रकारात एल ऍण्ड टी कंपनीतील काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा समावेश असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. या वायरची किंमत ८ लाख २५ हजार ६३६ रुपये एवढी आहे. माल ताब्यात घेतल्यानंतर एल ऍण्ड टी कंपनीला या चोरीबाबत माहिती देण्यात आली. ग्रामीण पोलिसांनी ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग व उपअधिक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, संतोष कांबळे, वैभव मोरे, संदीप काशिद, विनोद भितळे व अमित कदम आदींच्या पथकाने पार पाडली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:06 PM 03-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here