प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 26 जानेवारी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली (Maharashtra 2 child get National Bravery Award) आहे. यात महाराष्ट्रातील दोघांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. मुंबईची झेन सदावर्ते आणि औरंगाबादच्या आकाश खिल्लारे या दोघांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळणार आहे. झेन सदावर्ते या 12 वर्षाच्या मुलीने आगीदरम्यान 17 जणांना बाहेर काढलं होतं. तर आकाशने नदीत बुडणाऱ्या मायलेकीची सुटका केली होती. देशभरातून 10 मुली आणि 12 मुले अशा 22 जणांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्रातल्या दोघांचा समावेश आहे.
