बाबासाहेबांच्या स्मारक आराखड्याच्या पाहणीस शरद पवार ‘इंदू मिल’मध्ये

0

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या आराखड्याची माहिती घेण्यासाठी इंदू मिल येथे आले आहेत. पवार यांच्यासोबतच पक्षाचे जेष्ठ नेते नवाब मलिक व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाची संपूर्ण माहिती घेण्यात येणार असून यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीच्या कामाला चांगलीच गती मिळाली आहे. यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या आराखड्याचा आढावा घेतला होता. तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा निधी वाडिया हॉस्पिटलला द्यावा अशी मागणी केली होती. आंबेडकरांच्या या मागणीनंतर शरद पवारांच्या इंदू मिल भेट ‘वंचितला’ राजकीय शह देणारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here