राजापूर : अतिवृष्टीचा कोकणाला मोठा फटका बसला असून सोमवारी दुपार नंतर राजापूर शहराला पूराचा वेढा बसला. अर्जुना नदी आणि कोदवली नद्याचे पाणी राजापूर शहरातील बाजारपेठेत शिरल्याने जवाहर चौक जलमय झाला. नगरपरिषदेने सायरन वाजवून नागरिकांना सतर्क रहाण्याचा इशारा केला आहे. यंदाच्या पावसाळ्यात राजापूर शहरात तिसऱ्यांदा पूर आला आहे.
