जालगाव तालुक्यातील कादिवली दापोली मार्गावर मंगळवारी दुपारी रोड रोलरचे चाक अंगावरून गेल्याने रोलर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रकांत राठोड वय ४१ रा. कुंबळे हे
मंडणगड येथून पालवणी कादिवली मार्गे आज रोडरोलर घेऊन येत असताना दुपारी २ वाजणेचे सुमारास बॉडीवली थोरलाकोंड येथील एका तीव्र उतारातून हा रोलर खाली येत असताना चालक चंद्रकांत राठोड यांचा रोलर वरील ताबा सुटला व ते अचानक रोलरखाली आले, रोलरचे लोखंडी चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
