केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची आजची बैठक अचानक रद्द; मोदी रात्रीच अमित शहांना भेटले

0

नवी दिल्ली : मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी आज सायंकाळी आयोजित केलेली बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. आजची बैठक रद्द झाल्याने मंत्रिमंडळ विस्तारासाठी पुन्हा वेळ लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्या किंवा गुरुवारी मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी आज सायंकाळी मोठ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डा, राजनाथ सिंह, निर्मला सितारामन, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, प्रह्लाद जोशी आणि नरेंद्र सिंह तोमर हे उपस्थित राहणार होते. परंतू मोदी यांनी काल रात्रीच गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे सचिव बी एल संतोष यांची भेट घेतली. यानंतर हा आजची बैठक रद्द करण्याच निर्णय घेण्यात आला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळाचा हा विस्तार याच आठवड्यात किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. हा विस्तार ७ किंवा ८ जुलैला होईल. चांगले काम न करणाऱ्या मंत्र्यांना हटविले जाणार आहे. तर नव्या दमाचे जवळपास २२ नेत्यांना या विस्तारात संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. याचबरोबर काही मंत्र्यांची खाती बदलली जाण्याची शक्यता आहे. मोदी सरकार-२ ला दोन वर्षे होऊन गेली आहेत. यामुळे आगामी पाच राज्यांतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या त्या समाजाचे नेते, राजकीय समीकरण दिसण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:29 PM 06-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here