भविष्यात जर एमपीएससी च्या मुलांना न्याय मिळाला तर तो फक्त स्वप्निलच्या त्यागामुळे असेल : अमित ठाकरे

0

पुणे : एमपीएससी परीक्षेत पास होऊन मुलाखतही झाली. परंतु दीड वर्ष नियुक्ती रखडल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरूणाने आत्महत्या केली. आज पुण्यात स्वप्निल लोणकरच्या कुटुंबांची मनसे नेते अमित ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी अमित ठाकरेंनी संवाद साधला. ते म्हणाले की, भविष्यात जर एमपीएससी च्या मुलांना न्याय मिळाला तर तो फक्त स्वप्नीलच्या त्यागामुळे असेल. या लढाईत तुम्ही एकटं नसून संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या सोबत आहे असा धीर स्वप्निलच्या कुटुंबीयांना दिला आहे. शासनामध्ये लाखभर जागा रिक्त आहेत मग मुलं अशा टोकाला पोहचेपर्यंत सरकार झोपलं आहे का? असा सवाल अमित ठाकरेंनी सरकारला विचारला आहे. मनसेकडून स्वप्निलच्या कुटुंबीयांना २ लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:56 PM 06-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here