काल जे घडलं ते लाजिरवाणं होतं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाला काल सुरुवात झाली. मात्र अधिवेशनाचा पाहिलाच दिवस वादळी ठरला. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन झालं आहे. दरम्यान या सर्व घडोमोडींच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ‘काल जे काही घडलं, हे कितीही कुणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं’, असे म्हणत विरोधकांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, काल जे काही घडलं, हे कितीही कुणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं. ही आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही. हल्ली जे काही चाललेलं आहे. ते बघितल्यांतर एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचावण्याकडे आपला कल आहे, की खालवण्याकडे आहे? असा प्रश्न पडतो. पण मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे. वेडवाकडं वागायचं, आरडाओरडा करायचा. हे करायचे असेल तर रस्त्यावर करु शकता. मात्र, सभागृहामध्ये माईक असतात. माईक ओढायचे हे काही आरोग्यदायी लोकशाहीचे लक्षणं नाही. भास्करराव यांच्या दालनात जे काही घडलं त्यातील बरचसं वर्तन त्यांनी केलं. ते ऐकल्यानंतर सिसारी यावं असं हे वर्तन आहे. हा देशात तसेच राज्यात पायंडा पाडयाला नको आहे. त्यासाठी प्रत्येकांना आपली मर्यादा काय आहे, हे समजून घ्यायला हवे, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:57 PM 06-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here