बापरे! मुरुड समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळला तब्बल ७० फूटांचा व्हेल मासा

0

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीनजीकच्या मुरुड समुद्रकिनारी बुधवारी सकाळी महाकाय वेल मासा मृतावस्थेत आढळून आला. त्याची लांबी सुमारे ७० फूट आहे. दहा ते बारा दिवसापूर्वी समुद्रात त्याचा मृत्यू झाला असावा आणि लाटांमुळे वाहून तो समुद्रकिनारी आला असावा, असा अंदाज आहे. तो कुजलेल्या अवस्थेत असल्याने किनाऱ्यावर दुर्गंधी पसरली आहे. या माशाला पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. मात्र त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याचे गांभीर्य लक्षात घेऊन दापोली वनविभागाने समुद्रकिनाऱ्यावर वाळूत जेसीबीच्या साह्याने भलामोठा खड्डा खोदून या माशाची विल्हेवाट लावली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here