एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक

0

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. 2016 मध्ये पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी तपास करत असलेल्या ईडीने चौधरी यांची रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर ही कारवाई केली. ईडीच्या या कारवाईमुळे येत्या काळात एकनाथ खडसे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भोसरी येथील एमआयडीसी भूखंड घोटाळाप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी, यांच्यासह इतरांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. खडसे यांच्यावर पदाचा दुरुपयोग करून हा जमीन व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर, ही जमीन शारदा खडसे यांच्या नावावर असून आर्थिक व्यवहाराबद्दलही त्यांच्यावर आरोप आहेत. भाजपला रामराम करत एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आले होते. यानंतर ईडीने भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी एकनाथ खडसे यांना नोटीस बजावली. पुढे ईडीने तपास सुरू ठेवला. ईडीने खडसे यांचे जावई चौधरी यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावले होते. रात्री उशिरापर्यंत चौधरी यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
10:16 AM 07-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here