देशाने एक महानायक गमावला, शरद पवारांकडून दिलीप कुमारांना श्रद्धांजली

0

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी दिलीप कुमारांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही दिलीप कुमारांच्या आठवणीत भावुक झाले. शरद पवार म्हणाले, ‘जेजुरीत दिलीप कुमार यांचं शुटिंग सुरू होतं. आम्हाला त्याची कुणकुण लागली. मग आम्ही मित्रांनी सायकली काढल्या आणि सायकलवरून प्रवास करत जेजुरी गाठली. त्यावेळी मला पहिल्यांदा लांबून का होईना दिलीप कुमार यांना पाहता आलं’. नंतर मी राजकारणात आलो. सरकारमध्ये विविध पदावर असताना दिलीप कुमार यांच्याशी माझा दोस्ताना झाला. ते लोकप्रिय आणि महान अभिनेते होतेच. पण माणूस म्हणूनही तितकेच ग्रेट होते, अशा शब्दात शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्याबाबतच्या आठवणी जागवल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:39 AM 07-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here