26 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरू – मंत्रिमंडळाकडून मंजुरी

0

मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. नाईट लाईफ म्हणजे पब आणि बार नसेल. पब आणि बार रात्री दिड वाजेपर्यंतच सुरू राहिल. ज्यांनी ज्यांनी जीआर वाचला नाही. ते याला विरोध करत आहेत. तसेच मुंबईतील नाईट लाईफमुळे पोलिसांवर ताण वाढणार नाही, असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं. रोजगार निर्मीती आणि महसूल वाढवण्याबरोबर लोकांना 24 तास सेवा मिळावी या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. पब आणि बारसाठी महसूलचे निर्णय आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान, इतर हॉटेल्स, दुकानं आणि मॉल्स 24 तास सुरू राहतील. यात 24 तास दुकानं सुरू ठेवणं बंधनकारक नाही. हे प्रत्येकावर अवलंबून आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here